Home Latest News भंडाऱ्यात 21 मे रोजी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन शिबिर

भंडाऱ्यात 21 मे रोजी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन शिबिर

0
3

हंसराज भंडारा :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय भंडारा अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मांग गारुडी व या समाजातील बारा पोट जातीतील लोकांना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गुरुवार, दि.21 मे 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. तरी या कार्यशाळेस भंडारा जिल्ह्यातील मातंग समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आनंद वाडीवे यांनी केले आहे.