spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अल्पवयीन दोन मुलींवर ५५ वर्षीय नराधमाचे कुकर्म

– आरोपीविरोधात रामटेक पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

सचिन चौरसिया, रामटेक :- पोलिस ठाणे रामटेक हद्दीतील बोरडा( सराखा) गावात दोन अल्पवयीन मुलींवर चॉकलेट व १० रुपये देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो ऍक्ट ) तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदेव तुकाराम वासनिक (५५, रा. बोरडा-सराखा, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या दोन्ही मुली गावातील शाळेत शिकत असून, त्या दुपारच्या सुटीत शाळेतून गावातील दुकानात चॉकलेट खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी जयदेवने दोघींना चॉकलेट विकत घेऊन देण्याची बतावणी केली आणि दोघींनी दुकानाच्या बाजूला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला त्याने दोघींना प्रत्येकी १० रुपये देऊन हा प्रकार घरी कुणाला सांगू नका, अशी सूचनाही त्याने दोघींना केली. दोघींनीही हा प्रकार सायंकाळी त्यांच्या आईना सांगितला. त्यामुळे दोघींच्याही कुटुंबीयांनी जयदेवला विचारणा केली. त्याने मात्र आपण असला प्रकार केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठून तक्रारी दाखल केल्या. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम तसेच पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करीत पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत .

पॉक्सोअंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामटेक पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम ६४(२), ६४(२)(i), ६४(२)(m) आणि ६५(२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो), २०१२ मधील कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही पीडित मुलींच्या तक्रारींच्या अनुषंगाने दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

Popular Articles