spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 96 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.शुक्रवार(ता.10) रोजी शोध पथकाने 96 प्रकरणांची नोंद करून 43,600 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.100 चे दंड वसुली केली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून रू.2,000 चे दंड वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग, बोर्डिंगचे हॉल,सिनेमाहॉल,मंगलकार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून रू.4,000 रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 14,500 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 45 प्रकरणांची नोंद करून 9,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु. 4,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.झेस्ट मल्टीकोर हॉस्पीटल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले.हनुमाननगर झोन अंतर्गत मे.खुशी इंफ्रास्ट्रक्चर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे.इनोवेटिव्हरिटेल प्रा.लि. यांनी अनधिकत जागी दुकानाचा कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.भावना स्वीटस अँड ज्यूस कॉर्नर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/-चे दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे. श्री दुर्गा अपार्टमेंट यांच्यावर इमारतीचे वाहते पाणी रस्त्यावर आल्याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. क्रितीक ट्रेडर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/-चे दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत गुरप्रीत सिंग जब्बाल यांनी बोअरवेल विहिर खोदकामाची माती आणि चिखल रस्त्यावर टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000 दंड वसूल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.