आनंद नगरात अवैध बांधकाम करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न,सिओ नी दिले काम बंद करण्याचे आदेश

0
76

कामठी :- येथील नवी कामठी भागातील आनंद नगरात निर्माणाधीन अवैध अतिक्रमण बांधकाम विरोधात नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

माजी नगरसेवक लालसिंग यादव, प्रतिक पडोळे,संध्या रायबोले यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.

प्रभाग 16 तील आनंद नगर येथील बंद असलेल्या दाल मिल लगतच्या रिकाम्या प्लाट वर अतिक्रमण करुन अवैध निर्माण कार्य केल्या जात होते. यामुळे स्थानीय जवळपास 60-70 परिवारांचा आवागमनचा रस्ता बंद होत आहे.

स्थानीय रहिवाश्यानी याची तक्रार भाजपा पदाधिकाऱ्याना दिली.त्या नंतर सिओ विनोद जाधव यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. विनोद जाधव यांनी तत्काळ आदेश जारी करुन अवैध बांधकाम निर्माण कार्य बंद केले.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाजपा कामठी शहर अध्यक्ष मंगेश यादव, भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,प्रतिक पडोळे,लालसिंग यादव,कपिल गायधने,श्रावण केलझरकर, राजकुमार हाड़ोती,अजित सोनकुसरे तथा स्थानीय निवासी उद्धव यादव, अशोक देवांगन, बंशीराम शाहू, महेश गोखले,अजय शेंडे, अतुल दुपारे, सोनू अमृतवार,रोहित तरारे,आनंद यादव,अश्विन बंसोड, अजय शाहू,मनोहर सोनकुसरे,अभिलाष यादव, शरद यादव,परसराम समुन्द्रे, जयपाल यादव, शानू ग्रावकर, कुणाल सोलंकी,कैलाश मलिक यांचा समावेश होता.

बॉक्स अवैध बांधकामाची तक्रार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना करण्यात आली असता त्यांनी लगेच सिओ ला फोन करुन नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात नगर परिषद चा एक कर्मचारी लिप्त असून त्याची तक्रार महसूल मंत्री बावनकुले यांना करण्यात आली आहे.