spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा याविषयावर मार्गदर्शन शिबीर.

यवतमाळ, 1 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच मुलींवरील सर्व प्रकारचा हिंसाचार दुर करण्यासाठी पावले उचलणे या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शंकरलाल कोठारी विद्या मंदिरच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक दाभाडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून शंकरलाल कोठारी विद्या मंदिर इंग्लिश मिडीअम स्कुलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोठारी व गुरूकुल इंग्लिश मिडीअम स्कुलच्या मुख्याध्यापिका वैशाली चांडक तर प्रमुख वक्ते म्हणून  जिल्हा ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.दिपक दाभाडे यांनी समाजात वावरत असतांना चांगल्या गोष्टी आत्मसात करावे, वाईट गोष्ट सोडून द्यावे, असे यावेळी सांगितले. बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

वक्ते माधुरी कोटेवार यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा याबाबत माहिती दिली. तसेच असे काही प्रकार घडत असल्यास शिक्षक किंवा आई वडीलांना निर्देशनास आणून द्यावे, असे सांगितले. तसेच लहान मुलांच्या अधिकाराविषयी सांगितले. अन्यायावर आवाज उठवण्याकरीता कोणाची मदत घ्यावी आणि प्रत्येक मुल कसे सुरक्षित राहील याबाबत माहिती दिली. फेसबुक, इंन्स्टाग्राम अशा सोशल माध्यमांद्वारे मुलींना कशाप्रकारे फसविल्या जाते याबाबत उदाहरण देवून समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचलन शंकरलाल कोठारी विद्या मंदिराच्या  शिक्षिका अनुराधा विनय जोशी यांनी केले तर आभार प्रणाली मिर्झापुरे यांनी मानले. कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थीनी व विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.