सत्संग महिला भजन मंडळ तर्फे गणपती बाप्पाची आराधना

0
161

कामठी ता ४  –  संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे,सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असो की घरो घरी विराजमान श्री चे मोठ्या भक्ती भावाने पूजा अर्चना केली जात आहे अनेक ठिकाणी भजन कीर्तनचे देखील आयोजन केले जात आहे या अनुषंगाने कामठी तालुक्यातील  कढोली गावातील सत्संग    महिला भजन मंडळ तर्फे भजन कीर्तन करण्यात आले.
यांच्या डोलकीच्या तालावर  या महिला भजन मंडळींनी गणपती बाप्पाची आराधना केली .
याप्रसंगी   शांतकला वाघ, स्मिता मोरे, शारदा मोरे, माया दळणे, नानु ठाकरे, रेखा गावंडे, सविता गावंडे, महादेव काकडे,
रेखा बोरकर,
उमा ठाकरे,कन्या सविता गावंडेचा भजन मंडळीत सहभाग होता