spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सामूहिक गीतापठण कार्यक्रम रद्द करा, जिल्हाधिकाऱ्याकडे बसपाची मागणी 

नागपूर ५ : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून 15 नोव्हेंबर 2025 रोजी 5 वी ते 12 व्या वर्गा पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा होणारा सामूहिक गीतापठण कार्यक्रम होऊ नये व त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यातर्फे देण्यात आलेले संमतीपत्र रद्द करावे अशी मागणी आज बहुजन समाज पार्टीने जिल्हाधिकारी विपिन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय महामुनी यांच्याकडे एका शिष्टमंडळा द्वारे केली आहे.
शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिला महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, एड वीरेश वरखडे, अंकित थूल यांचा समावेश होता.
याविषयी सविस्तर असे की नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती चे अध्यक्ष प्रा अनिल सोले यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतापठण प्रशिक्षणासाठी शिक्षकांना उपस्थित राहणे बाबत पत्र दिले होते.
त्यानुसार 3 सप्टेंबर 25 रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निखिल भुयार व माध्यमिक शिक्षणाधिकारी गौतम गेडाम यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना 9 व 10 सप्टेंबर रोजी उपस्थित राहणे बाबत एक आदेश काढला. हा आदेशच मुळात असंवैधानिक व धर्मांधतेचा प्रचार प्रसार करणारा आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करावा अशी बसपाच्या शिष्टमंडळाने मागणी केलेली आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती ही काही गटांच्या लोकांकरता, काही समूहाकरता  व काही धर्माकरिता काम करणारी समिती आहे. शाळेमध्ये सर्वधर्माची व सर्व समाजाची मुलं शिकत असतात. त्यामुळे एका धर्माची गीता सर्वांवर लादणे हे मुळात चुकीचे आहे. तसेच गीतेत वैज्ञानिक दृष्टिकोनावर बंदी घालण्यात आली आहे. गीतेने चातुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थन केलेले आहे.
गीतेत हिंसेला प्राधान्य आहे. येथे कर्मकांडाला वाव आहे. बुद्धी प्रामाण्यवादाला वाव नाही. गीतेत स्त्रियांना अपमानित करण्यात आलेलं आहे. येथे अनेक असवैधानिक गोष्टीचा बोलबाला आहे. त्या गीतेचे शासकीय स्तरावर सामूहिकरित्या महिमा मंडन करणे, वाचन करणे, समूहपठण करणे, म्हणजे भारतीय संविधानातील कलम 14, 15 व 91 चे उल्लंघन होइल.
म्हणून माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीला दिलेले संमती पत्र विनाविलंब रद्द करावे असेही निवेदनात म्हटले आहे. नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांच्याशी चर्चा करून लवकर निर्णय घेतो असे आश्वासन दिल्याचे उत्तम शेवडे यांनी म्हटले आहे.
म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या या अशासकीय कार्यक्रमाला शासकीय स्तरावरून परवानगी देऊ नये व दिलेली परवानगी ही रद्द करावी असे निवेदनात नमूद केलेले आहे. निवेदनासोबत खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचा अर्ज व शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची संमती बसपा कार्यकर्त्यांनी जोडलेली आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.