Home Latest News ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिलादुन्नबी च्या जुलुसाचे स्वागत

ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिलादुन्नबी च्या जुलुसाचे स्वागत

0
115
Oplus_131072
 
कन्हान ८ : – ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे ईद मिला दुन्नबी च्या जुलुसा मध्ये सहभागी नागरिकांना शरबत वितरण करून स्वागत करण्यात आले.
           शनिवार (दि.५) सप्टेंबर २०२५ ला ईद मिला दुन्नबी पावन पर्वावर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस काढण्यात आला. प्राथ मिक आरोग्य केंद्र सामोर महामार्गावर ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शरबत वितरण करून सर्वाचे स्वागत करून ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी सुन्नी रज्जा मश्जिद माजी सदर शकील सिध्दीकी, मश्जिद सदस्य शहिद खान यांचा सत्कार केला. याप्रसंगी ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण कन्हान चे हबीब शेख, सचिन साळवी, मधुकर नागपुर, पुरूषोत्तम येणेकर, राजु गणोरकर, संतोष गिरी, प्रविण गोडे, रेखा टोहणे , जाफर खान, कमलेश पांजरे, नेवालाल पात्रे, गोविद जुनघरे सह सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.