Home Latest News ‘ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त’ विविध कार्यक्रम

‘ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त’ विविध कार्यक्रम

0
58
nmc

 

दोन अंकी नाटकाची मेजवानी; बाकी शून्य‘ नाटकाचे सादरीकरण

नागपूर, ता. १३ : नागपूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीद्वारा नागपूर महानगरपालिका आणि मनपा ज्येष्ठ नागरिक कक्ष  संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दोन अंकी नाटकाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.

“जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिक व कुटूंबातील सदस्यांकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात स्विप अंतर्गत जनजागृतीसाठी कार्य केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान, डॉ. रमेश थोरात यांची “शेतकरी आत्महत्या रोखण्यावर” आव्हानात्मक एकपात्री प्रयोग, संजय भाकरे फाऊंडेशनद्वारे निर्मित ज्येष्ठांच्या जीवनावर भाष्य करणारी व वेदना अधोरेखित करणारी दोन अंकी कलाकृती “बाकी शून्य” सादर करण्यात येणार येणार आहे.

या सर्व कलाकृतीचा लाभ घेण्याचे आवाहन  हुकूमचंद मिश्रीकोटकर,  फेस्कॉम चे अध्यक्ष  सुधीर भगत,  सचिव डॉ. शेंडेकर, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठाणचे सचिव डॉ. राजू मिश्रा, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ चे अध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, सचिव अॅड.अविनाश तेलंग, सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, डॉ. तांबुलकर,  वसंत पाटील,  मनोहर तुपकरी, वासुदेव वाकोडीकर,  प्रमिला राऊत,  गीता महाकाळकर,  माधुरी भुजाडे,  मधुकर पाठक,  भगवान टिचकुले, काशिनाथ धांडे,  विजय दिक्षित, अॅड. उपासे, कमल तायडे आणि सचिव व मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक यांनी केले आहे.