खापा, वार्ताहर :- जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत सावनेर तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा २०२५- २६ चे आयोजन दि.११ सष्टेंबर व १२ सप्टेंबरला डॉ. हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविघालय सावनेर येथील मैदानात कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धमध्ये सावनेर तालुक्यातील विविध विद्यालयांनी सहभाग घेतला. या स्पर्धमध्ये जिजामाता विद्यालय, खापा येथील १९ वर्षा खालील मुलीनी कबड्डी स्पर्धमध्ये शानदार प्रदर्शन करुन दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही दबदबा कायम ठेवून तालुकास्तरीय विजेते पद पटकावले.
खापा शहर येथील विद्यार्थ्यांचे आई, वडील आणी खेळाडू प्रेमी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या स्पर्धमध्ये सहभागी मुस्कान कठौते, गायत्री सोनवाने, लिपाशी चौरीवार, लोमेश्वरी नान्हे, श्रेया बावणे, समीक्षा रोकडे, पायल ठाकरे, परिणिता हिंगवे, जानव्ही बावणे, श्वेता आडे, प्राची ठाकरे या खेळाडू विद्यार्थिनींना मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याबाबत श्रेय क्रिडा शिक्षक तसेच प्रशिक्षक उमेश चोरे तसेच विद्यालय मुख्याधापक सुधाकर गजभिये तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले.




