कुही न्यायालय लोकअदालतीत जवळ आली…. मने होती दुरावलेली….
साळवा : दिनांक १३-०९-२०२५ रोजी दिवानी व फौजदारी न्यायालय, कूही येथे लोकअदालत समुपदेशनाच्या माध्यमातून दुरावलेली नाती तूटता तुटता परत जुळून आली.
दिवानी दावे ६५-२०२५ सुभास लुटे वि. नत्थू लुटे, ५८-२०२२ संतोष साभरे वि. जगदीश सभारे, ६२-२०२५ बंदु खडसे वि. उत्तम खडसे, ०१-२०२० योगराज वि. बलिराम, ६३-२०२५ नानाजी तीतरमारे वि. बालाजी तीतरमारे, १८-२०२५ लक्ष्मी वादिभस्मे वि. विक्रम वडिभस्मे,०६-२०२५ विजेंद्र पंचबूढ़े वि. रामदास पंचबूढ़े, २८-२०१२ प्रभाकर ठवकर वि. प्रेमदास ठवकर ह्या केस मध्ये आज समेट घडून आला असून कौटुंबिक कलहातून विकोपाला गेलेला वाद आज संपुष्टात आला.
आज कूही न्यायालय येथे तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका वकील संघ, कूही यांच्या संयुक्त विद्यमाने महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायाधीश पी. के. मुटकुळे ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला जेष्ठ विधिज्ञ अँड. नाकाडे, अँड. वंजारी, अँड. प्रसाद , ॲड. शिंदे , अँड. किंदरले , अँड. कावड़कर, अँड. बंसोड, अँड. मोहरे, तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. थोटे ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर लोकअदालती मध्ये न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी दखलपात्र- ४७, कौटुंबिक – ०१, १३८ एन.आय. कायद्या अंतर्गत ०३, बँकेची ००, दिवाणी दावे ०७ व इतर गुन्हा मंजूरची अशी एकुण ५८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व ६,१७,११५/ – रू. दंड वसुल करण्यात आला.
ह्या लोकअदालतमध्ये दावापुर्व प्रकरणात महवितरणची ४, बँकेची १७, कौटुंबिक ०१, ग्राम पंचायत कर वसुलीची ६६७ अशी एकुण ६८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकुण १,६१,६८२४/- रुपये एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम सुद्धा वसुल करण्यात आली. ह्या लोकअदालत मध्ये पी. के. मुटकुळे हे पैनल हेड तर अँड. डी. एस. वंजारी ह्यांनी पैनल मेंबर म्हणून आपली भूमिका उत्तमरित्या बजावली.
आज होऊ घातलेल्या लोकअदालतीच्या यशस्वीतेकरिता सर्व न्यायालयीन कर्मचारी आणी पोलीस यंत्रणा यांनी मोलाचे योगदान दिले तसेच मोठ्या संख्येने पक्षकारांनी उपस्थीत राहुन आपली प्रकरणे निकाली काढली आणि लोकअदालत यशस्वी केली. विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी आर. सी. बोरकुटे सह इतर सर्व कर्मचा-यांनी लोकअदालतीचे नियोजन उत्तमरित्या पार पाडले.




