मुंबई – संगीतविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन झाले. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली.
जुबीन गर्ग यांनी बॉलिवूडमध्ये गाजलेलं ‘गँगस्टर’ या इमरान हाशमी आणि कंगना रनौत स्टारर चित्रपटातील ‘या अली’ हे गाणं गाऊन लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याने त्यांना केवळ हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं नाही, तर त्यांचं नाव देशोदेशी गाजलं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी, आसामी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली होती.
source : पुढारी




