spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धारेगावगावातील जुगार अड्ड्यावर धाड २ लाख ६७ मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस प्रशासनाची संयुक्त कार्यवाही.

 

महागाव तालुक्यात धारेगाव शिवारातील फिरत्या जुगारावर पोलिसांची धाड; सहा आरोपी अटकेत

यवतमाळ संजय कारवटकर ०४ : महागाव तालुक्यातील धारेगाव शिवारात सुरू असलेल्या फिरत्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा व महागाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई काल (बुधवार) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – अविनाश ओंकार घुमर, देवानंद दत्ता धांडे, बंडू साहेबराव लोखंडे, व्ही. चव्हाण, राहुल नंदकुमार वानखेडे आणि भिकाजी राघोजी घाटमोरे. महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील धारेगाव शिवारात “बादशाह” नावाचा फिरता जुगार अवैधरित्या सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि महागाव पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त धाड टाकली.

धाडसत्रादरम्यान काही जुगारी पोलिसांना चकवा देत पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात २६ हजार रुपये रोख, तीन दुचाकी वाहनं आणि काही मोबाईल फोन यांचा समावेश आहे. ही संयुक्त कारवाई महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, मुन्ना आडे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पांडगळे आणि राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Popular Articles