गोंदिया :- जिल्ह्यातील तेलीटोला जवळ वन्यप्राणी गाडीच्या समोर आल्याने वन्यप्राण्याला वाचण्याच्या नादात चालकाचे गाडीचे नियंत्रण गेल्याने चार चाकी गाडीने झाडाला धडक दिली हि दुदैवी घटना 22 सप्टेंबर च्या रात्री 3 वाजता घडली.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की गाडी चालक शिवम भाऊलाल दहीकर वय वर्ष 21 वर्षे राहणार परमात्मा नगर गोंदिया हा टाटा नेक्सन कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक MH-35 AR 1608 ने आपल्या दोन मित्रासह दुर्ग (छत्तीसगड )येथून देवरी मार्गे आपल्या स्वगावी गोंदिया येथे येत असतानाच मौजा तेलीटोला जवळ वन्य प्राणी आडवा आल्याने वन्यप्राण्याला वाचण्याच्या नादात गाडीचे नियंत्रण गेल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन दोन झाडाच्या मध्ये धडक दिल्याने त्यात गाडी झाडांमध्ये फसली. गाडीच्या इंजिनचे अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले असुन कोणत्या प्रकारची जीवित हानी झाली नाही. अपघाताच्या घटनेची नोंद सालेकसा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.




