– राज्यात कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
– सुप्रसिद्ध गायिका पंचशीला भालेराव यांचा भीम गीतांचा जलसा
भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी भारतातील पहिला असा ऐतिहासीक लाँगमार्च काढणारे आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील युवा नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी २३ सप्टेंबरला ‘युवा चेतना दिन’ साजरा केला जाणार आहे. ‘युवा चेतना दिन’निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड,दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदुर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे राज्यभरात विविध अनाथालय, रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. तसेच नागपुरातील सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आल्याची माहिती पीरिपा प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली.
देशातील आंबेडकरी, बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी, वंचित घटकातील युवकांमध्ये संघर्षरुपी स्फूर्ती व एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना संविधानाच्या संरक्षणार्थ लढण्यास प्रेरित करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लाडके युवा नेते जयदीप जोगेंद्र कवाडे हे ४२ व्या वर्षात पदापर्ण करणार आहेत. देशभरात पीरिपा ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करणार असल्याचेही लिंगायत म्हणाले. नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्यालयात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका ‘भीमराज की बेटी फेम’ पंचशीला भालेराव यांच्या भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला लॉगमार्च प्रणेते, भीमसैनिकांचे सरसेनापती, आंबेडकरी आंदोलनातील क्रांतियोद्धा, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रतिमा जयदीप कवाडे (राष्ट्रीय नेत्या, महिला आघाडी), प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय पाटील, नागपूर शहर अध्यक्ष कैलाश बांबोले, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे, नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पलाश ठवरे, शहर महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा मानवटकर, शहर युवा आघाडी अध्यक्ष सोहेल खान, पूर्व विदर्भ सचिव डेनी सोमंकुवर, महिला आघाडी अध्यक्षा सूचिता कोटांगले, ग्रामीण महिला आघाडी अध्यक्ष सुनीता शेंडे, उत्तर नागपूर अध्यक्ष कुंदन उके, तसेच अजय चव्हाण, दिलीप पाटील, सोपान मानवटकर, शितल बोरकर, संजय खांडेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत.




