spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; २ आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 

नागपूर ०४ : पारडी पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या टोळीतील आणखी दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अटकेत असलेल्या आरोपींनी शहरात एकूण सात घरफोड्या केल्याची कबुली दिली असून, त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटना २१ जून रोजीची नागेश्वर नगरात राहणाऱ्या अनुपम वाघमारे या महिलेनं आपल्या घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबासह पुलगावला गेलेल्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून सोनं-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत वाघमारे यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, संदीप टेंभरे या कुख्यात चोराने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली आहे. त्यानुसार पारडी पोलिसांनी मध्य प्रदेशातील सिवनी येथे जाऊन संदीप टेंभरे व त्याचा साथीदार महेंद्र कुशवाहा यांना अटक केली.सखोल चौकशीत त्यांनी नागपूर शहरात आणखी सात ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले असून, त्यांच्या माहितीवरून एकूण ११ लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संदीप टेंभरेविरुद्ध याआधीही २० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला जुगाराची लत असून, त्याच सवयीच्या पूर्ततेसाठी तो पुन्हा पुन्हा चोरी करत असल्याचं समोर आलं आहे.पुढील तपास पारडी पोलिस करत आहेत.

Popular Articles