Home Latest News मजा घेण्यासाठी तो करतो रेल्वेने प्रवास

मजा घेण्यासाठी तो करतो रेल्वेने प्रवास

0
66

– विद्यार्थिनी, महिलांवर असतो डोळा

– चोवीस तासात आरोपी आरपीच्या जाळ्यात

नागपूर :- तसा तो नातेवाईकाच्या दुकानात बसून वेळ घालवतो. काम आटोपल्यानंतर रेल्वेने प्रवास करून मजा घेतो. प्रवासी घाईत असतात, त्यामुळे पोलिस तक्रारीच्या भानगडीत पडत नाही, याच संधीचा त्याने फायदा घेतला. हमत वाढल्याने त्याचा नित्याचाच क्रम झाला. रविवारी तर त्याने विदर्भ एक्सप्रेसमध्ये कहरच केला. मात्र, नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. जितेंद्र लारोकर (30) रा. पैकनटोळी, गोंदिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

पीडित तरुणी बी.टेक. ची विद्यार्थिनी आहे. रविवारी गाडी क्रमांक 12106 विदर्भ एक्प्रेसने गोंदिया ते नागपूर असा प्रवासी करीत होती. नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास गाडी थांबली. त्यानंतर प्रवासी उतरत होते. गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेचा विनयभंग केला आणि पळून गेला. घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस अधीक्षक मंगेश शिदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली तसेच आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून आरोपचा शोध सुरू केला.

दरम्यान पोलिसांनी रेल्वे स्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी निष्पन्न झाला. पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान तो सोमवारी पुन्हा विदर्भ एक्सप्रेसने नागपुरात आला. यावेळी मात्र, तो आउटरवरच उतरला. पोलिस पथकाला दिसताच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची सखोल चौकशी केली. ही कारवाई पोलिस हवालदार प्रशांत उजवणे, श्रीकांत उके, चंद्रकांत भोयर, भूपेश धोंगडी, राहुल गवई, धम्मपाल गवई, मजहर अली यांनी केली.

वेळ मिळताच निघतो प्रवासाला

आरोपी जितेंद्रला आई वडिल आहेत. इयत्ता नववी पर्यंत त्याचे शिक्षण झाले. काकाच्या दुकानात काम करतो. काम आटोपताच भंडारा, गोंदिया, नागपूर आदी मार्गावर रेल्वेने प्रवास करतो. विशेषत जनरल डब्यात गर्दीच्या ठिकाणीच असतो. संधी मिळताच महिला, तरुणींच्या पाठीमागे उभा राहतो आणि मजा घेतो. गर्दी असल्यामुळे कोणी आक्षेपही घेत नाही. कोणी आक्ष्ोप घेतला तरी गर्दी आहे, धक्का तर लागेलच, असे म्हणून वेळ मारुन नेतो.