सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर यांची पाटणबोरीतील जुगारावर धाड

0
119

– २० आरोपीसह पावने सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- पाटणबोरी येथील जॅकपॉट वाईन बारच्या मागे रुममध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी कारवाई करत २० आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ५ लाख ८४ हजार १४० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दिनांक २२ सप्टेंबर रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर ड्युटीवर असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजा पाटणबोरी येथील जॅकपॉट वाईन बारच्या मागील इमारतीत काही इसम ५२ पत्त्यांवर जुगार खेळत आहेत. पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली. धाडीत पोलिसांना शेख आसिफ शेख चांद वय ४० वर्षे, रा. दत्तनगर पारवा ता. घाटंजी, शेख नसीर शेख मदार वय ५३ वर्ष, रा. रामनगर आदिलाबाद (तेलंगणा), शेख रउफ शेख उस्मान वय ४६ वर्षे, रा. मोमीनपुरा आर्णी, शेख रहेमान शेख अब्दुल वय ५० वर्षे, रा. संत मारोती महाराज वार्ड घाटंजी, राजु नानाजी वाघ वय ४७ वर्षें, रा. नगरपरीषद मागे दुर्गा माता वार्ड घाटंजी, सद्दाम रज्जाक शेख वय ३२ वर्ष, रा. मज्जित पुरा पारवा ता. घाटंजी, अंकुश केशव नागेकर वय ३५ वर्ष, रा. तिवसाळा ता घाटंजी, दत्ता लक्ष्मण कापडे, वय २४ वर्षे, रा. कोद्दोरी ता. केळापूर, सतीष पीराजी अंडेवार वय ४८ वर्षे, रा. क्रांतीनगर आदीलाबाद (तेलंगणा), पंकज रंजनराव भोयर वय ३९ वर्षे, रा. घुबडी ता. केळापुर जि. यवतमाळ, नामदेव जिवन नव्हाते वय ४० वर्षे, रा. गजानन वार्ड घाटंजी, रूपेश भाऊराव भोयर वय ४६ वर्षे, रा. खापरी, ता. घाटंजी, राजेश शिवप्रसाद धुत वय ४८ वर्ष, रा. भुक्तापुर आदीलाबाद (तेलंगणा), आशिष संतोष करनमवार वय २७ वर्षे, रा. मांडवी ता. झरीजामणी, रामकिसन माधव किनाके वय ५९ वर्षे रा. टेंभी ता. केळापूर, राजेश उद्धव बोबडे वय ३२ वर्ष, रा. गजानन वार्ड घाटंजी, उदय महेश गुप्ता वय ३७ वर्षे, रा. राममंदीराजवळ घांटजी, फिरोज अयुब खान वय ४६ वर्षे, रा. मुबारक नगर आर्णी, आकाश रामराव मोहीते वय ३० वर्षे, रा. दत्तनगर पारवा ता. घाटंजी हे जुगार खेळतांना आढळले, तर ओम संजय शिर्तावार राहणार पाटणबोरी हा आरोपी फरार आहे. या कारवाईदरम्यान सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ४३ हजार रुपये रोख रक्कम, १८ मोबाईल फोन, २ मोटारसायकल वाहने आणि ५२ पत्त्यांचे २४ गट्ठे, २० नग खुर्च्या, ५ टेबलचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत गुन्हा नोंदवला. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर, जमादार राम राठोड, गजानन पत्रे, पोलीस नाईक किशोर आडे, पोलीस शिपाई विकेश ध्यावर्तीवार व सुर्यकांत गिते यांनी केली.