spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एकही राष्ट्रीयकृत बँक नसलेल्या गांगणेर येथे अंगठा लावून ग्रामस्थ क्षणातच करतात सर्वच राष्ट्रीयकृत बँकेची रकमेची देवाण घेवाण, वेळ वाचून मजुरीही जात नसल्याने ग्रामस्थ मानत एअरटेल पेमेंट बँक चे आभार

किशोर साहू: मौदा ,ता. २५ :- चाचेर – तारसा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गांगनेर येथे एकही राष्ट्रीयकृत बँक नसून येथील नागरिक क्षणातच अंगठ्याच्या साहाय्याने सर्वच राष्ट्रीय बँकेचे व्यवहार करत असल्याने वेळ वाचून मजुरी ही जात नसल्याने,त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या एअरटेल पेमेंट बँक चे आभार मानले आहे.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की,दीड वर्षांपूर्वी येथील नागरिकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी येथून अंदाजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तारसा किंवा चाचेर येथे जावे लागत होते. त्यातच बँकेच्या व्यवहाराची वेळ व मजुरांच्या कामाची वेळ ही सारखीच असल्याने बँकेचे व्यवहार करण्यासाठी एक दिवसाची मजुरी बुडवावी लागत असे. परंतु दीड वर्षापासून एअरटेल द स्मार्टफोन नेटवर्क च्या साह्याने एअरटेल पेमेंट बँक चा वापर करून येथील नागरिक सर्वच राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवहार त्यांच्या मजुरीची वेळ म्हणजेच दुपारची वेळ सोडून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी अगदी क्षणात अंगठा लावून करत आहेत. या बँकेच्या माध्यमातून रक्कम टाकण्याचे कमिशन द्यावे लागत नसून, रक्कम काढण्याचे अल्पसे कमिशन ऑपरेटर सागर ठाकरे घेत असल्याचे गावातीलच महिला मजूर शांताबाई सोनसरे यांनी सांगितले. माझ्यासह गावातील इतर मजूर वर्ग ही या पेमेंट बँक प्रणालीने अत्यंत आनंदित असल्याचे त्यांनी वार्तालाप करताना सांगितले. तर बँकेच्या देवाण-घेवाणाचे संदेश क्षणातच खातेदारांच्या मोबाईलवर येत असल्याने, या व्यवहारात पारदर्शिता असल्याचे एअरटेल पेमेंट बँक चे ऑपरेटर सागर ठाकरे यांनी वार्तालाप करतांना सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.