नागपूर :- सुरेश करुजी कोचे यांना 14 सप्टेंबर रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन च्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा आयुष महासन्मान पुरस्कार 2025 मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तारांकित हॉटेलला मुंबई तेथे देण्यात आला. या पुरस्काराला भारतातील शेकडो आयुष डॉक्टर व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या. सोबतच डॉ. मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाईल्ड & वुमेन डॉ.एम गणेश असिस्टंट डायरेक्टर & हेड ई सी -राजकोट & उदयपूर एम एस एम ई पी पी डी सी मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ भारत सरकार, अधिकारी डॉ.प्रणव पांड्या, ए आय एम ए राष्ट्रीय सल्लागार डॉ प्रवीण जोशी उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, पदाधिकारी डॉ, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, डॉ.रवी शिंदे, डॉ.रचित म्हात्रे, डॉ. जनार्धन यादव, डॉ.विनोद ढोबळे, डॉ. राकेश झोपे, डॉ.भूषण नागरे, डॉ.विजय नवल पाटील, डॉ.फुके डॉ. रामेश्वर शिंदे, डॉ.मेश्राम, प्रवक्ते तुषार वाघूळदे इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.








