spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चिकणा येथिल सार्वजनिक वाचनालय वाऱ्यावर

साळवा :- कुही तालुक्यातील मौजा चिकणा येथे १९९७ पासून सरकामान्य मुक्तद्वार चिकणा सार्वजनिक वाचनालय कार्यरत आहें. पण गेल्या ७-८ वर्षापासून चिकणा सार्वजनिक वाचनालय नेहमी बंद असते, वाचनालय मध्ये बसण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, वाचनालय कोण सांभाळते, याचाही काही पता नाही. येथे स्पर्धा परीक्षेची भरपूर पुस्तकं असल्याचे सांगण्यात येते पण तिथे प्रत्यक्षात पुस्तकं मात्र खूप कमी आहेत,

जोपर्यंत श्रीधर मेश्राम यांचेकडे वाचनालयाचे नियोजन होते तोपर्यंत वाचनालय व्यवस्थित होते, त्यांच्या मृत्युंनंतर वाचनालय सुरेंद्र भिवाजी गणवीर. याचेकडे किरायाने आहें. पण वाचनालयाची ही जबाबदारी व चावी सध्या कुणाकडे आहें माहित नाही. गेल्या ७ – ८ वर्षांपासून वाचनालय पूर्णपणे बंदच असते. त्यांचा दरवर्षीचा निधी जाते.कुठे वाचनालय अत्यंत दयनीय अवस्थेत आहें.

प्रतिक्रीया*

गावातील युवा मुलांना मागील 7-8 वर्षा पासुन या वाचनालयाचा लाभ मिळतच नाही. या वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रभाकर पानतावंणे, नागपुरला राहत असुन दर वर्षीचा येणारा निधी खर्च केला कुठे,असाही ग्रामस्थांना प्रश्न निर्माण झालेला आहे.

      – राष्टपाल गोडांणे युवा सामाजिक कार्यकर्ता चिकणा*

Popular Articles