– सी जे पटेल कॉलेज तिरोडा येथे झाली स्पर्धा परीक्षा*
तिरोडा :- युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोडा च्या वतीने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खुमेंद्र (विक्की) रहांगडाले यांनी स्पर्धा परीक्षेचे आयोजित केली होती. दिनांक 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता दरम्यान सी जे पटेल कॉलेज तिरोडा येथे स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. सुरुवातीला गुगल फॉर्मच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे रजिस्ट्रेशन अर्ज मागविण्यात आले, त्यामध्ये सुमारे 998 स्पर्धकांनी परीक्षेत नोंदणी केली व त्यानंतर अर्जांची छाननी करून 703 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बोलाविण्यात आले. त्यापैकी या स्पर्धेत एकूण सुमारे 503 परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेचे निकाल दिनांक 5 आक्टोंबरला सकाळी 11 वाजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेत प्रथम येणाऱ्या परीक्षार्थीला लॅपटॉप, द्वितीय क्रमांक टॅब व तृतीय क्रमांक मोबाईल असे पारितोषिक देण्यात येणार आहे सोबतच प्रत्येक सहभागी परीक्षार्थीला प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे.
याबाबतीत खुमेंद्र रहांगडाले तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा यांच्याशी अधिक बोलले असता त्यांनी माहिती दिली की अशा प्रकारचे परीक्षेचे आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. स्पर्धा परीक्षांना समोरे जाण्यास त्यांना सोयीचे होते. म्हणून अशा प्रकारचे उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी खुमेंद्र रहांगडाले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवक राष्ट्रवादी काँग्रेस तिरोडा तालुका अध्यक्ष पदाची जिम्मेदारी सोपविली. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र ही देण्यात आले. त्यांनी आपली नियुक्ती सार्थ असल्याचे ठरवत नियुक्ती होताच बोदलकसा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. व त्यानंतर आता भव्य स्वरूपात तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले. व असेच उपक्रम राबवित राहणार असल्याचे खुमेंद्र रहांगडाले यांनी प्रामुख्याने सांगितले.




