spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवरात्र रास गरबा महोत्सव चे आयोजन

-‘ दांडीया नृत्यावर ‘ थिरकले समर्थ चे चिमुकले 

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच शनिवार (दि.२७) सप्टेंबरला नवरात्री निमित्त रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या दांडीया नृत्याने अनेकांचे लक्ष वेधले होते. नवरात्रीच्या औचित्याने तथा रामटेकचे माजी नगरसेवक सुमित कोठारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुमित कोठारी, रितेश चोकसे उपस्थित होते. सर्वप्रथम श्री सुमित कोठारी यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी दांडिया नृत्य सादर केले. गरबा महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन दांडिया नृत्य सादर केले. दरम्यान याप्रसंगी नवदुर्गा च्या रुपात ९ मुलींचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जौंजाळ यांचे मार्गदर्शनात पार पडला. कार्यक्रमाचे संचालन मथुरे यांनी तर आभाप्रदर्शन चौरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular Articles