spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ पोलिसांचे कार्य कौतुकास्पद

कामठी :- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोराडीतील मोबाइल, पर्स शोधून नागपूर शहर पोलिसांनी दहा दिवस प्रभावी बंदोबस्त ठेवून मूळमालकांना कायदा व सुव्यवस्था राखली. हरविलेल्या नागरिकांना शोधून नातेवाइकांच्या स्वाधीन केले. तसेच हरविलेल्या वस्तू मूळ मालकास केल्या परत केल्या.

जगदंबा देवी मंदिर व पारडीतील भवानीमाता मंदिर येथे मूळमालकास परत केल्या. कोराडी मंदिर परिसरातून ३५ हरविलेल्या स्त्रिया, मुले व ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. १३ हरविलेल् मोबाइल फोन परत केले. २४ पर्स, पिशव्या, रोख रक्कम व कागदपत्रांसह शोधून मूळमालकांना दिल्या. पारडीतील भवानी मंदिर परिसरातून १५ हरविलेल्या नागरिकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. ६ हरविलेल्या मोबाइल फोनचा शोध घेऊन त्यांच्या मूळ मालकांना परत केले. ८ पर्स, पिशव्या, रोख रक्कम व कागदपत्रेही शोधून मूळ मालकास परत दिलेत. अशाप्रकारे एकूण ५० हरविलेल्या इसमांचा शोध घेऊन नातेवाइकांच्या स्वाधीन केले. १९ मोबाइल व ३२ पर्स, पिशव्या, रोख रक्कम व कागदपत्रांसह शोधून मूळ मालकास परत दिल्या. कोराडी व पारडी येथे बंदोबस्तावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ कोराडी व पारडी बंदोबस्तात असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद असून नागपूर पोलीस हे नागरिकाप्रति संवेदनशील, जवाबदार आणि जणस्नेही असल्याचे अधोरेखित करते.नागपूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे.

सदर बंदोबस्त पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनार्थ सहपोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्या देखरेखीत डीसीपी निकेतन कदम यांच्या उपस्थितीत एसीपी अंकुश खेडकर,सह वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्ग यांनी केली.

Popular Articles