spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एसटीच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

साळवा :- धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी व्हायचे असल्याने एक प्रवासी कुही बसस्थानकावर आले होते. पण दुर्दैवाने एसटी बस मागे येत असताना ते मागील चाकात अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी ही दुर्दैवी घटना कुही येथील बसस्थानकावर घडली.

महादेव उरकुडा नागदेवते असे मृत इसमाचे नाव आहे. सत्तर वर्षीय महादेव नागदेवते यांना नागपुरातील दीक्षाभूमी येथील सोहळ्यात सहभागी व्हायचे होते. यामुळे २ ऑक्टोबर रोजी ते कुही बसस्थानकावर आले होते. ते एसटी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. तेव्हाच एमएच १४ बीटी ४४०६ क्रमांकाची एसटी बस तिथे आली व चालक तिला मागे घेत असताना महादेव नागदेवते मागच्या चाकात आल्याने त्यांच्या दोन्ही पायावरून चाक गेले. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

कुही बसस्थानकावरून ती एसटी बस वळण घेत असताना हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. याप्रकरणी कुही पोलिसांनी आरोपी चालक मंगेश वाहक काय करतात ?

बसस्थानकावर जेव्हा एसटी गाडी फलाटावर लावण्यासाठी मागे आणायची झाल्यास वाहकाने चालकाला मदत करणे अभिप्रेत आहे. पण बहुतांश प्रसंगात चालकाला मदतीसाठी वाहक येत नाही. असाच प्रकार कुहीत घडला असावा. समजा वाहकाने खाली उतरून चालकाला गाडी मागे आणत असताना सहकार्य केले असते तर नक्कीच अपघात टाळला आला असता. आज कुणाच्या तरी चुकीने एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. यामुळे भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी एसटी बस मागे आणत असताना वाहकांना मदतीसाठी सक्तीचे आदेश दिले जावेत, अशीही भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

ज्योतीराम मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कुही बसस्थानकावरचा हा अपघात महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.

Popular Articles