spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

12 लाख 86 हजार किंमतीच्या प्लास्टिक बॅग जप्त

– मनपा व एमपीसीबीची संयुक्तपणे धडक कारवाई

 नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या संयुक्त कारवाईत वर्धमाननगरातील एका आस्थापनेवर छापा मारून 12 लाख 86 हजार 500 रुपये किंमतीच्या प्लास्टिक बॅगचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली. वर्धमाननगरातील बिग बास्केट टाटा इन्टरप्रायझेस वेअर हाऊसमधून 6 हजार 650 किलोग्रॅम वजनाच्या प्लास्टिक बॅग या कारवाईत जप्त करण्यात आल्या.

वर्धमाननगरातील नंदूजी मानकर यांच्या मालकीच्या बिग बास्केट टाटा इन्टरप्रायझेसवर ही कारवाई मनपाच्या एनडीएसचे प्रमुख वीरसेन तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रीक सहाय्यक वैभव राऊत, प्रफुल वर्मा, पथक प्रमुख नत्थू खांडेकर, राजेंद्र मेश्राम,  राणा प्रताप सिंग, विवेक बोबडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

उपद्रव पथकाची कारवाई

मनपाच्या उपद्रव पथकाने विविध आस्थापनांवर कारवाई करून दंड 70 हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली. यात प्लास्टिक बंदी, विकासकांनी रस्त्यावर टाकलेले बांधकाम साहित्य, मनपाचे चेंबर कचर्याने बंद करण्याची कृती दिसून आल्याने कारवाई केली आहे.

आठ रस्ता चौकातील मेसर्स मंगेश दी ब्लिसने मनपाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मानेवाडा भागातील मे. कटियार इंफ्रावर सुद्धा कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. चिंचभवन भागात रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य पसरविल्याच्या आरोपावरून मे. जे. पी. रेसिडन्सीवर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे झिंगाबाई टाकळी परिसरातील गोल्डन मिडोजने मनपाच्या आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्याच्या विरोधात कारवाई करून 10 हजार रुपयांची वसुली केली आहे. याशिवाय मे. जयदुर्गा, बादल पांडे, मे. ओम डिस्पोझल अँड सेल्स, मे. वंदना किराणा स्टोअर, मे. गंगाचरण किराणा स्टोअरवर सुद्धा कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे व कचरा पसरविणार्यांच्या शहरात सर््व झोनमध्ये कारवाई करून 41 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Popular Articles