spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वीरांगना दुर्गावती मडावी यांची जयंती उत्साहात साजरी

कन्हान :- बिरसा मुंडा आदिवासी गोंडवाना संघर्ष समिती कन्हान द्वारे महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी यांची ५०१ वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन बोरडा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर इनवाते, प्रमुख अतिथि बोरडा ग्राम पंचायत सदस्य रामराव बंड, नवलसिग धुर्वे, गगन सिरसाम, नरेश धुर्वे, रविंद्र वरखडे, शुभम उईके आदि मान्यवरांच्या हस्ते महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

मान्यवरांनी वीरांगना दुर्गावती मडावी यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन कले. अल्पोपहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल टेकाम यांनी केले. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन संदीप परते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक महाराणी दुर्गावती मडावी आदिवासी गोंडवाना समिती बोरडा अध्यक्ष परमेश्वर उइके, उपाध्यक्ष विष्णु कोडवते, सदस्य इंद्रपाल इरपाते, रामेश्वर खुद्दयाम, समीर टेकाम, तुषार वाढवे, अर्जुन कोडवते, सुरेश उईक, अनिकेत टेकाम, रितिक अमृते, सनम दादुरे, गुणवंत अमृते, विकी महादुले, विकी दादुरे सह आदि आदिवासी समाज बांधव आदीने सहकार्य केले.

Popular Articles