spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फलोत्पादन विकासासाठी विविध घटकांकरिता अनुदान शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ :- महाराष्ट्र हे राज्य विविध फळे व इतर फलोत्पादन पिकांच्या उत्पादन व निर्यातीमध्ये आघाडीवर असून, राज्य शासनाने फलोत्पादन क्षेत्राचा विस्तार साधण्यासाठी कृषि समृद्धी योजनेअंतर्गत ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना विविध घटकांकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत घटकांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. फळपिक लागवडी मध्ये ड्रॅगनफ्रुट (२.७० लाख /हे.), स्ट्रोबेरी (०.८० लाख /हे.) लागवडीकरीता, फुलपीक लागवडी अंतर्गत दांड्याची फुले (०.५ लाख हे.) कंदवर्गीय फुले (१.० लाख /हे.). सुटी फुले (०.२ लाख (हे) लागवडीकरीता, मसाला पिके लागवड अंतर्गत मिरची (०.२० लाख /हे), आले, हळद (०.४ लाख /हे), औषधी व सुगंधी वनस्पती लागवडी करिता (०.६ लाख /हे.), संत्रा फळबाग पुनार्जीव्वन (रु ०.२४ लाख /हे), सामुहिक शेततळे (खर्च देण्यात येत आहे. तसेच वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, अळीबी उत्पादन मापदंडाच्या ७५% अनुदान) करिता अनुदान प्रकल्प, हरितगृह व शेड्नेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, पॅकहाउस व कांदाचाळ ह्या घटका करिता खर्च मापदंडाच्या ५०% अनुदान देण्यात येत आहे. तसेच संकलन एकत्रीकरण केंद्र, पूर्व- शितकरण गृह, फिरते पूर्व-शितकरण गृह, शितखोली, सौरऊर्जा शितखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, एकात्मिक शितसाखळी प्रकल्प करिता खर्च मापदंडाच्या ३५% अनुदान देण्यात येते.

या सर्व घटकांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन संतोष डाबरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Popular Articles