spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

4407 अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

– प्रवीण दटके यांनी लढली कामगारांच्या अस्तित्वाची लढाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधातील 4407 अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांना आता लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होणार आहेत. आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभा सदस्य पदी निवडून आल्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी तातडीने पाठपुरावा सुरू केला. दटके यांनी या विषयाकरिता विधिमंडळाच्या डिसेंबर 2025 चे अधिवेशन तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये अधिसंख्य पदे निर्माण निर्माण करण्यासाठी लक्षवेधी प्रश्नांच्या माध्यमातून मागणी लावून धरली तसेच सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचीही आग्रही मागणी केली.

या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेतील 4407 ऐवजदार कर्म चाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची 8560 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत तसेच महानगरपालिकेतील अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेल्या समय कर्मचाऱ्यांना वारसांना लाड पागे समितीच्या शिफारनुसार वारसाचा हक्क चा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर व्यपगत होत असल्याने कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासाठी पद निर्माण करता येत नव्हते ही अट रद्द करावी यासाठी प्रवीण दटके यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वारंवार निवेदनाद्वारे तसेच बैठकीच्या माध्यमातून विनंती केली होती.

या निर्णयाचा लाभ होणार असून अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेल्या परंतु मयत किंवा सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आता वारसा हक्काचा लाभ मिळणार असल्याने सफाई कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत.

तसेच , या निर्णयाचा लाभ घेऊन मयत अथवा सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काचा लाभ देण्याकरिता माननीय आयुक्त नागपूर महानगरपालिका ज्यांच्याकडे तातडीने अर्ज करण्याचे आवाहन आमदार प्रवीण दटके यांनी केले आहे.

सफाई कामगारांच्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण होईल असा हा निर्णय घेतलाबद्दल आमदार प्रवीण दटके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , वित्त मंत्री अजित पवार , अनुसुचित जमाती आयोगाचे अध्यक्ष सतीश डगोर तसेच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांचे आभार व्यक्त केले.

Popular Articles