spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची आज सोडत

– नागरिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नागपूर :- नागपूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 13 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने नागपूर जिल्हा परिषद विभागाच्या सदस्यांचे आरक्षण सोडत आणि पंचायत समितीतील निर्वाचक गणाच्या सदस्यांची आरक्षण सोडत सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. या सोडतीसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

नागपूर जिल्हा परिषद विभागाच्या सदस्यांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुपारी 1.00 वाजता बचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे डॉ. विपीन, जिल्हाधिकारी नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

नागपूर जिल्हयाअंतर्गत येणाऱ्या एकूण 13 पंचायत समितीतील निर्वाचक गणाच्या सदस्यांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुपारी 1.00 वाजता संबंधित तालुका मुख्यालयी सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे.

Popular Articles