किशोर साहू मौदा, ०८: संपूर्ण मौदा तालुक्यात सोमवार (दि. 7 जुलै )ला सकाळपासूनच सततधार पावसामुळे नागरिक, शेतकरी, शेतमजूर त्यांचे दैनंदिन कार्य करण्यासाठी घराबाहेर निघालेच नसल्याने रस्ते ,शेतशिवार वृत्तपत्र वितरण करीत असताना संपूर्ण तालुक्यात निर्मनुष्य दिसले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात कर्फ्यू सदृश्य स्थिती दिसली. तालुक्यातील सर्वच नदी, नाले ओसंडून वाहताना दिसले. पावसाच्या सततधारपणा असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती ओढवण्याची शक्यता तालुक्यातील गावागावातील अनेक नागरिकांनी बोलून दाखवली. बातमी लिहेपर्यंत पाऊस सुरूच होता.







