spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अहिल्या किड्स मध्ये आषाढी एकादशीला चिमुकल्यांचा थाटामाटात कार्यक्रम संपन्न

हिंगणा ०८ : सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित अहिल्या किड्स प्री स्कूल, भोसलेवाडी, हिंगणा येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचे पोशाख परिधान करून आले होते. त्यामुळे विठ्ठल रुक्माईचे प्रत्यक्षात दर्शन घडवून आणले. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी वारकरी वेश्यामध्ये आले त्यामुळे अहिल्या कीडच्या प्रांगणात जणू पंढरपुर अवतरले असे वाटत होते. सर्व प्रथम विठ्ठल रुक्माई चे पूजन करण्यात आले त्यानंतर पालखी  काढण्यात आली. मुलांनी व परिसरातील लोकांनी याचा भरपूर आस्वाद घेतला. त्यानंतर मुलांनी वारकरी गाण्यावर नृत्य करून विठ्ठल नामाचा गजर केला. या कार्यक्रमाला सरदार मल्हार होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या सदस्य सुनिता कंटीराम चतुर, प्राचार्या  अश्विनी शरद उरकुडे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शाळेतील शिक्षिका वंदना गोहणे, करुणा सरोकार, वैशाली राखुंडे, शिक्षकेतर कर्मचारी सुषमा भिलकर यांनी पुढाकार घेतला.

Popular Articles