किशोर साहू, मौदा :- विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा यांनी दिवाळीपूर्वी स्तुत्य उपक्रम राबवीत शाळेतील विद्यार्थ्यांकडून मातीचे दिवे बनवून त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा उपक्रम राबविला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी केवळ मातीचे दिवे कसे बनवायचे हे शिकले नाही तर दिवाळी सणाचे महत्त्व आणि प्रकाशाचे महत्त्व देखील जाणून घेतले.
विद्यार्थ्यांनी मातीचे दिवे बनवले, त्यांना सजवले आणि रंगांनी रंगवले.
या उपक्रमाचे आयोजन करून, शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता विकसित करण्याची आणि दिवाळीचे महत्त्व समजून घेण्याची संधी दिली. विश्रांती कॉन्व्हेंटच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सर्वच कॉन्व्हेंट व शाळांनी दिवाळीपूर्वी हा उपक्रम राबवावा अशी मागणी मौदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागलेली आहे.








