धामणगाव येथे आज भाजपच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रम

0
68

– धामणगाव येथे आज भाजपच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रम, माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्या अभिष्टचिंतन दिनी व त्यांच्या गृह ग्रामपंचायतीत भाजप या कार्यकर्ता संवादच्या माध्यमातून गोडबोलें सारखा तगडा उमेदवार तारसा – धामणगाव जि प सर्कल मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांच्या संवादाच्या माध्यमातून घोषित करणार असल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा

किशोर साहू,मौदा :- 13 ऑक्टोबरला मौदा तालुक्यातील 5 जिल्हा परिषद सर्कल व 10 पंचायत समिती गण यांचे आरक्षण घोषित होताच निवडणुकीत लढण्यास इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असून मतदारांशी भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. तारसा – धामणगाव जिल्हा परिषद सर्कल नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या सर्कल मधून मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या तारसा येथील शालिनी देशमुख सह देवेंद्र गोडबोले काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा तालुक्यात आहे. त्यामुळे उद्या रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला देवेंद्र गोडबोले यांच्या जन्मदिनी भाजपाने गोडबोले यांच्या गृह ग्रामपंचायत धामणगाव येथील सामुदायिक भावनात तारसा – धामणगाव जि प क्षेत्रातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता संवादाच्या कार्यक्रम दुपारी एक वाजता आयोजित केला आहे. या कार्यकर्ता संवादाच्या माध्यमातून महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोडबोलेंसारखा तगडया उमेदवा राची घोषणा करणार असल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.

सध्या भाजपकडून तारसा – धामणगाव जि प सर्कलमध्ये जि प उमेदवारीसाठी तारसा येथील माजी सरपंच आनंद लेंडे , आजनगाव येथील सरपंच चिंतामण सारवे, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत तारसा पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सावरगाव येथील भाजपच्या कीर्ती पायतोडे यांचे पती वीरेंद्र पायतोडे, बाबदेव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कारेमोरे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. इतर पक्ष व इतर उमेदवारही या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा असून येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे. तारसा – धामणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास , तरीही ते या क्षेत्रातून निवडणूक लढणारच असल्याचे धामणगाव येथील राजकीय जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. गोडबोले हे मागच्या पंचवार्षिक जिल्हा परिषद निवडणुकीत चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्रात अटीतटीच्या लढतीत भाजपच्या कैलास बरबटे कडून पराभूत झाल्यानंतरही, जनादेशाच्या कौल स्वीकारत ,जनतेशी नेहमी संपर्कात राहिले, हे विशेष! असेही त्या धामणगाव येथील राजकीय जाणकारांने सांगितले.