spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदार यादीत घोळ

– डिगडोह जागृती मंचचा आरोप; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, चौकशीची मागणी

डिगडोह :– डिगडोह जागृती मंचाने नगर परिषद डिगडोहच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदार यादीतील घोळाबाबत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक १२ मधील प्लॉट क्रमांक १५ए या एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे आढळून आली आहेत. ही बाब लक्षात येताच मंचाने संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मंचाने पुढे स्पष्ट केले की, मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा पाया असून, त्यात झालेल्या चुकांमुळे निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्वरित तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Popular Articles