कन्हान :- केरडी ता. पारशिवनी येथील श्री गणपत ठाकरे यांचे घरून काकड आरती काढण्याची परंपरा मागील ५० वर्षापासुन सुरू असुन कार्तिक पौर्णिमेला श्री हनुमान मंदीर केरडी येथे गोपाल काल्याचे किर्तन आणि महाप्रसाद वितरण करून समारोप करण्यात येतो.
कोजागिरिच्या नंतर पहाटे सकाळी ५ वाजता केरडी ता. पारशिवनी येथील श्री गणपतजी ठाकरे यांचे घरून भजन मंडळासह वाजत गाजत काकड आरती काढुन श्री हनुमान मंदीरात आरती करण्याची ही परंपरा मागील ५० वर्षापासुन सुरू असुन ही काक ड आरती नियमित करण्यात येते. कार्तिक (टिपुर ) पौर्णिमेला श्री हनुमान मंदीर केरडी येथे गोपाल काल्या चे किर्तन करून महाप्रसाद वितरणाने समारोप कर ण्यात येतो. काकड आरतीच्या यशस्वितेकरिता केरडी गावातील नागरिक रामचंद्र काठोके, पुरुषोत्तम ठाकरे, पांडुरंग काठोके, प्रकाश लेकुरवाळे, दिलीप काठोके, रामभाऊ हिवसे, विठ्ठल ठाकरे, रोशन भडंग, राहुल वानखेडे, सागर खंडाळ, महेश भोयर, आयुष वानखेडे, शुभम काठोके आणि बालगोपाल सर्व नियमित उपस्थित उपस्थित राहुन सहकार्य करित असतात.








