spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केशव नागरी सहकारी पतसंस्था शाखा पांढरकवडा चा १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पांढरकवडा :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चे औचित्य साधून केशव नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी, शाखा पांढरकवडा यांच्या वतीने दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ ला धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर शनिवार रोजी पांढरकवडा येथिल श्रीराम मंदीर येथे “पांढरकवडा शाखेचा वर्धापन दिन व भव्य सभासद मेळाव्याचे” यशस्वी आयोजन करण्यात आले. सहकाराचे महत्व अधोरेखीत करणे, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि सभासदांशी संवाद साधणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. सभासद व ग्राहक मेळाव्याला पांढरकवडा शाखेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटक अजीत डेहनकर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ तथा कार्यालयीन अधिक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ, प्रमुख मार्गदर्शक कवडु नगराळे, माजी उपप्राचार्य, सहकार प्रशिक्षण केंद्र, अकोला तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माँ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेचे गजानन बेजंकीवार हे होते. कार्यकमाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, मानद सचिव अनिल आक्केवार, संचालक अरूण कावडकर, पांढरकवडा स्थानिक संचालक प्रदिप राशतवार, विलास लाखे, तज्ज्ञ संचालक विनय कोंडावार स्थानिक सल्लागार समिती सदस्य रविकांत नस्कुलवार, राजु मुप्पीडवार, विठ्ठलराव लिंगरवार, सुरज जयस्वाल तसेच अनेक सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार उपस्थित होते. कार्यकमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी केले, त्यांनी संस्थेची आजवरची झालेली वाटचाल, संस्थेचा प्रवास, उद्दीष्टे, संकल्प व भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली. अजीत डेहनकर यांनी सहकाराचे महत्व विशद करून जागतीक पातळीवर सहकार मेळाव्याचे आयोजनाबाबत माहीती दिली. यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे तज्ञ संचालक प्रा. कवडु नगराळे सांनी आपल्या मार्गदर्शनातुन ‘सहकारातुन समृध्दी’ या संकल्पनेचे महत्व विषद केले आणि सहकार क्षेत्राचे सामर्थ व भविष्यातील दिशा यावर मैलिक विचार मांडले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड आणि मानद सचिव अनिल आक्केवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे विशेष आकर्षण होते तो सत्कार सोहळा, पतसंस्थेच्या आर्थिक मजबुती साठी महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या उत्कृष्ठ ठेवीदार विठ्ठलराव लिंगरवार, शेखर सोयाम, दर्शनलाल जयस्वाल, राजेंद्र खरात, भाऊराव ठाकरे व कर्जदार दिलीप सिर्तावार, प्रविण केडीया, मारोती गावंडे, प्रकाश उमरे यांचा तसेच शाखेचा विस्तार करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे तसेच कर्जवाटप व कर्ज वसुली करणारे दैनिक बचत प्रतिनिधी प्रविन पडगिलवार, गोपाल वागदे, केशव भोयर, रत्नाकर घोडे, दुर्गेश कडपलवार, मोनिश चिकणे, गजानन पाटील आणि पांढरकवडा शाखेत उत्तमपणे नेतृत्व करून या आर्थिक वर्षात शाखेला जास्तीत जास्त सुरक्षित सोने तारण कर्ज वाटप करून पांढरकवडा शाखेला रूपये ३३ लाखाहुन अधिक निव्वळ नफा मिळवुन दिल्याबद्दल शाखा व्यवस्थापक सुमित मधुकरराव पोटपेल्लीवार व कर्मचारी वृंदाचे विशेष सत्कार करण्यात आले. त्यांच्या समर्पन आणि विश्वासामुळेच संस्थेची प्रगती होत असल्याचे सांगत, मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या सन्मानाने संस्थेच्या प्रत्येक स्तरावरील घटकांना प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर संस्थेचे तज्ञ संचालक विनय कोंडावार यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि पतसंस्थेच्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्थानिक संचालक प्रदिप राशतवार मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार, शाखा व्यवस्थापक सुमित पोटपेल्लीवार, घाटंजी शाखेचे व्यवस्थापक उदय कुळकर्णी, राजेश गैनीवार, प्रसन्न बडवे, श्रध्दा राऊत, सानिका मोहुर्ले, आदित्य पारखे, दैनिक बचत प्रतिनीधी नंदकिशोर माळोदे, योगेश भाटी, आकाश गहरवाल, अक्षय परसुया, प्रविण नखाते, कुलदिप कानझोडे, अनघा नस्कुलवार अशोक राऊत आदींनी परीश्रम घेतले.

Popular Articles