spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खेतानी परीवारा तर्फे श्री गोरक्षण संस्थानला पाच लाखांची देणगी

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- समाज हितासाठी सतत पुढाकार घेणाऱ्या खेतानी परिवाराने पुन्हा एकदा आपली दानशूर परंपरा कायम ठेवत श्री गोरक्षण संस्थान, पांढरकवडा यांना ५ लाखांची देणगी दिली आहे. ही देणगी नवीन गोरक्षण शेड व झमारत बांधणीसाठी वापरली जाणार असून या योगदानामुळे संस्थेच्या विकास कार्याला नवसंजीवनी मिळाली आहे. या दानशूर कार्याबद्दल श्री गोरक्षण संस्थान व श्री दत्त मंदिर देवस्थान यांच्या वतीने अकबर सेठ खेतानी, नूरजहा अकबर अली खेतानी, सलीम खेतानी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शहरातील मान्यवर नागरिक, धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्तें मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी खेतानी परिवाराच्या समाजसेवेच्या वृत्तीचे सर्वानी कौतुक केले. पदाधिकार्यांनी सांगितले की खेतानी परिवाराने समाजसेवेचा जो दीप प्रज्वलित केला आहे, तो इतर दानशूरांसाठी प्रेरणादायी ठरेल.यावेळी सलीम खेतानी म्हणाले आमच्या कुटुंबाला मिळालेल यश समाजामुळेच आहे. त्यामुळे समाजासाठी काहीतरी देणं ही आमची जबाबदारी आहे. गोरक्षण कार्य हे केवळ धार्मिक नव्हे, तर पर्यावरण व संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. या सेवेत योगदान देऊ शकलो, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. खेतानी फाउंडेशनद्वारे शिक्षण, आरोग्य, गरजू कुटुंबांना मदत तसेच पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रांत सातत्याने उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या या दानशूर कार्यामुळे गोरक्षण सेवेला नवी ऊर्जा लाभली असून समाजात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

Popular Articles