सिरोंचा :- २८ वर्षांपूर्वी दहावी पास झालेल्या (१९९६-९७ बॅच) धर्मराव शाळा, सिरोंचा येथील माजी विध्यार्थानी मोठ्या दिमाखात स्नेह मेळावा पार पडला. शनिवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत शालेय प्रांगणात वृक्षारोपण करून या विध्यार्थानी शाळेविषयी व पर्यावरणाविषयी असलेली आपली आपुलकी व जिव्हाळा यांचे दर्शन घडवून आणले. आपल्या जुन्या मित्र व मैत्रिणींना भेटून व त्यांच्या बरोबर त्यावेळच्या वर्ग-खोलीत बसून विध्यार्थ्यांच्या आनंदाला पाराच उरलेला नव्हता. प्रत्येक विद्यार्थी गहिवरून गेला होता.
त्यानंतर आर आर फंक्शन हॉल येथे पुढील कार्यक्रम पार पडला. शाळेचे तत्कालीन मुख्याद्यापक जाधव हे अध्यक्ष स्थानी होते तर खापरे, उरकुडे, भेंडारकर, कातकर, नागुलवार, नागुलवार, राऊलवार, राऊलवार, शेषम , पापय्या, फसाद, लायक, इशाक व काडबाजीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांचा पुष्पगुछ, शाल, श्रीफळ, डायरी, पेन व स्मुतीचिन्ह देऊन सत्कार करतांना प्रत्येक विध्यार्थी आनंदाने व अभिमानाने प्रफुल्लित झाला होता.
प्रातिनिधिक स्वरूपात माजी विध्यार्थी व्येंकटेश मादेशी, अमित भसारकर, नादिया शेख व ज्योत्सना गुरुकर यांने आपले मनोगत व्यक्त केले व शाळेविषयी व गुरुजनांप्रती आपले ऋण व्यक्त केले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी उपस्थित विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना जुन्या आठवांनींना उजाळा दिला व आपले विध्यार्थानी वेगळ्या क्षेत्रात नाव-लौकिक मिळविल्याबद्दल आपल्या समाधानाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोपानंतर या उत्सवाची सांगता झाली. सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाची भर भरून कौतुक केली.
१९९६-९७ बॅचच्या सर्व विध्यार्थानी या कार्यक्रमामध्ये उस्फुर्त प्रतिसाद दिला. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सर्व सदस्य व तसेच स्थानिक मित्र- मैत्रिणींनी अथक परिश्रम घेतले.




