spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अरोली येथे उद्या सकाळी सहा वाजता राष्ट्रीय एकता दिवस निमित्य वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन 

किशोर साहू :मौदा, दि. ३१:- अरोली पोलीस स्टेशन तर्फे अरोली येथील शिव पार्वती मंदिर येथे उद्या शुक्रवारी (दि.31 ऑक्टोबर) ला सकाळी सहा वाजता राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 वी जयंती निमित्य वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावातील सर्व नागरिकांनी, शासकीय व निम शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक पोलीस स्टेशन अरोली यांनी केले आहे.

ही पोस्ट आपल्या सोशल मीडियावरील स्टेटसवर ठेवून गट ग्रामपंचायत बोरी (घिवारी )येथील सरपंच विशाल सेलोकर व रेवराल येथील सरपंचा मनीषा पाटील यांनीही या कार्यक्रमाविषयी जनजागृती करून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.