किशोर साहू, मौदा :- २०२० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडून आलो. जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस सत्तेवर होती, त्यामुळे सुरुवातीला कामे मिळाली नाही.तरीही स्वतः प्रयत्न करून विकास कामे खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलो .
नंतरच्या काळात कोरोना आला. दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली तरीही घरी न बसता जनसेवेच्या निर्धार घेऊन मास्क , सॅनिटायझर ,ॲम्बुलन्स ,राशन किट वाटप केले.कोरोना बाधित लोकांना दवाखान्यात नेण्याचे काम केले. कोरोना काळात भीतीचे वातावरण होते तरीही जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलो .
जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात विविध विकास कामे जसे बस स्टॉप ,गावांतर्गत सिमेंट रस्ते, भूमिगत नाली ,स्मशानभूमी,स्मशान भूमी कडे जाणारे रस्ते , स्मशानभूमीचे सौंदर्य करणे , 109 कोटी रुपयांच्या अरोली – निमखेडा – कन्हान या पूर्णत्वास येत असलेल्या रस्त्याच्या सिमेंटीकरणास, निमखेडा रेल्वे फाटकाजवळ अंडर ब्रिज व ओवर ब्रिज, गांगनेर (खंडाळा), सालवा ,येसंबा येथील रेल्वे फाटकावर ओवर ब्रिज मंजूर करण्यास व कामाची गती वाढवण्यास तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व सध्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तत्कालीन आमदार टेकचंद सावरकर, तत्कालीन आमदार व सध्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना व संबंधितांना तोंडी, भ्रमणध्वनीवरून व लेखी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला.

सर्कल मधील इतरही महत्त्वाचे रस्ते कन्हान -चाचेर -दुधाळा- अरोली, नेरला -दुधाळा -बार्शी- निमखेडा, रामटेक मौदा मार्गावरील नवेगाव आष्टी येथील महत्त्वाचे उड्डाणपूल , निसतखेडा येथीलही कमी उंचीच्या पुलाचे रूपांतर मोठ्या पुलात करणे ही सर्व कामे मंजूर करण्यासाठी संबंधितांकडे सतत पाठपुरावा केला ही सर्व कामे मंजूर झालेली आहेत. राज्यात व देशात महायुतीचे डबल इंजिनचे सरकार आल्याने व तालुक्यातील दोन्ही आमदारांना वजनदार मंत्रीपद मिळाल्याने महायुती सरकारच्या काळातीलच मंजूर झालेले तालुक्यातील मुख्य 236 करोड रुपयाच्या रस्ता मौदा – चाचेर – रामटेक , 112 करोड रुपयाच्या मौदा – निमखेडा – अरोली या सर्कल अंतर्गत जाणाऱ्या रस्त्याचे व तालुक्याचे इतरही रस्त्याचे सिमेंटीकरण युद्ध पातळीवर सुरू असून सर्कल सह तालुक्यातीलही संपूर्ण रस्ते , रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, अंडर ब्रिज, नदी नाल्यांवरील रपट्यांचे मोठ्या पुलात रूपांतर होण्याचे काम चकाचक होणार आहेत व सर्कल मधील सर्व मंजूर कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे सर्कलच्या चौफर विकास केल्याने माझ्यावर पुन्हा दुसऱ्यांदा विश्वास टाकावा असे ते सर्कल मधील तुमान गावात शारदा उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त जाऊन मतदारांशी संवाद साधत असताना चाचेर – निमखेडा सर्कलमधील भावी उमेदवार माजी जि प सदस्य कैलास बरबटे सांगत आहेत.
ते पुढे सांगतात की,स्वतःच्या खाजगी मदतीतून सर्व धर्माचा पूजा अर्चना स्थळांना बांधकामासाठी साहित्य पुरवले. जिल्हा परिषद च्या माध्यमातून सर्कल मधील गावागावात आराम खुर्चीचे वाटप केले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे शेतीत जाणारे पांदण रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहेत.
दरवर्षी गोर – गरीब नागरिकांसोबत दिवाळी सण दिवाळी स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाद्वारे साजरा करतो.
महसुल मंत्री तथा पालकमंत्री यांच्या आदेशाप्रमाणे पार्टीचे कामे गाव चलो अभियान, लाभार्थी अभियान , गावभेट घेऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे . सर्कल मधील सर्व जनतेला सत्तेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करत आहे. सर्कलमधील उरलेल्या इतर 21 गावातही शारदा उत्सव व मंडई निमित्त भेट देत असताना याच प्रकारे बरबटे मतदारांशी संवाद साधत आहे. त्यांच्यासोबत सर्कलमधील इतरही चर्चेत असणारे भावी उमेदवार माजी पंचायत समिती उपसभापती खेमराज चाफले,भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे, महामंत्री कैलास सोमनाथे, उपसरपंच धनराज हारोडे, मोतीराम घरजाळे ,रजत महादुले सह पक्षाचे इतरही पदाधिकारी ,कार्यकर्ता गण मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.




