spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ट्रेडिंग कंपनी व भागीदारी या नावावर असलेले रास्तभाव दुकान रद्द करण्याची मागणी – संजय पाटील

नागपूर :- ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन पुणे यांच्या अंतर्गत नागपुरात टिळक भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की रास्तभाव दुकानाचे नाव व परवानाधारकांचे नाव बदलवून ट्रेडिंग कंपनी व भागीदारी करण्याचा गोरखधंदा पुरवठा विभाग मंत्रालयात मोठ्या जोमाने सुरू आहे. हे सर्व कामे पैसे खर्च करणाऱ्या श्रीमंत लोकांचेच आहे. त्यामुळे गरीब दुकानदारावर अन्याय होत आहे. पुरवठा विभाग मंत्रालयात जे काम होत आहे ते त्वरित बंद करावे अशी मागणी यावेळी केली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी 2019 मध्ये बोगस आदेश दिले त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित संजय पाटील, सय्यद मुस्ताक, दिनेश तानवे, संगीता टेंभुर्णे, अरुण पाटणे, गुलशन तानवे, आणि संगीता उके यांची उपस्थिती होती.

Popular Articles