कन्हान :- लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रीय एकता दिवस निमित्त कन्हान पोलीस स्टेशन च्या वतीने “रन फॉर युनिटी” या उपक्रमांतर्गत “एक दौड राष्ट्रीय एकता और अखंडता के लिये. ” यामध्ये पोलिस आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय एकात्मता , ड्रग्जमुक्त समाज आणि सायबर सुरक्षा जागरूकता असे महत्त्वाचे संदेश देखील देण्यात आले.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार संपुर्ण देशात रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन नागपुर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये एका च वेळी केले. या पार्श्वभुमीवर शुक्रवार (दि.३१)ऑक्टों बर ला सकाळी ६ वाजता कन्हान पोलीस स्टेशन व्दारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्य राष्ट्रीय एकता दिवस “युनिटी” उपक्रमाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा नेतृत्वात पोलिस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या उपस्थित “एक भारत, सर्वोत्तम भारत” असा जयघोष करुन कार्यक्रमाची सुरूवात करून कन्हान पोलीस स्टेशन समोरुन पाच किलोमीटर धावण्याचा शुभारंभ करुन महामार्गने आंबेडकर चौक, तारसा चौक, सात नंबर नाका, संताजी नगर चौक, भारता माता चौक, कांद्री होऊन परत महामार्गाने रन फॉर यूनिटी मॅरेथाॅनचे कन्हान पोलीस स्टेशन येथे समापन करण्यात आले.

यावेळी सरदार पटेल यांनी ५६२ संस्थानांना एकत्र करून भारताला कसे एकत्र केले याची आठवण करून दिली. ही शर्यत केवळ एक खेळ नाही तर आपल्या राष्ट्रीय एकतेचे प्रतिक आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड यांनी संबोधित केले आणि पोलीस निरिक्ष क वैजयंती मंडवधरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अल्पोहार व मिठाई वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमात कन्हान युथ फाउंडेशनचे विकास कार्यकर्ते सुर्यभान फरकाडे, ऋषभ बावनकर, सुरज वरखडे, पोलीस पाटील गुंडेराव चकोले, लोमेश्वर गडे, अजय ईखार, नरेंद्र राऊत, पुंडलिक कुरडकर, संदीप नेऊल, संतोष ठाकरे, संजय नेवारे, अरविंद गजभिये, संदिप भोले, चक्रधर वासनिक, प्रदीप ऊके, योगेश नांदुरकर, राहुल कालबेले , कृणाल ब्राम्हणे, कैलाश कारेमोरे, कांचन मस्के, सुषमा मस्के, शालु हरडे, सोनु गेडाम, विकास हटवार, शुभम बल्लारे, शिवाजी चको ले, प्रशांत मसार, दिपक तिवाडे, शिवशंभु आखाड्यांचे कोच अनिकेत निमजे, हर्षल कोसरे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.




