सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपूर पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रामटेकमध्ये मंगळवारी भव्य शोभायात्रा आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनसेवा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या ऐतिहासिक शोभायात्रेचे यंदाचे हे ४४ वर्ष आहे. राम डेव्हलपर्स व मित्र परिवार तर्फे श्री खाटू शाम बाबा चे दर्शन या झाकी नी शोभायात्रेत रामटेक नगरितील लोकांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेतील आकर्षक झांक्या पाहण्यासाठी परिसरातून मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ४ वाजता अठराभुजा गणेश मंदिरात पूजेनंतर यात्रेची सुरूवात झाली. कालंका मंदिर, शास्त्री चौक, आंबेडकर वार्ड, बसस्टँड, गांधी चौक, लंबे हनुमान मंदिर असा फेरफटका मारल्यानंतर नगरपरिषद मैदानात यात्रेचा समारोप झाला.




