– 34 पैकी 17 जागा महिलांसाठी,पुरुषांना पडद्या आड राहून सूत्रे हलवावी लागणार
कामठी :- कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीने येथील प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.एकूण 17 प्रभागतिल 34 सदस्यांपैकी 17 जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक जुन्या जाणत्या आणि महत्त्वाकांक्षी पुरुष इच्छुकांच्या वलं मनसूब्यावर पाणी फेरले गेले आहे.
कामठी नगर परिषद साठी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे ज्यामुळे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून इच्छुकांनी स्वयंघोषित उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी आधीच दंड थोपटला आहे.तसेच नगरसेवक पदासाठी काही ठिकाणीमहिलासाठी आरक्षण निघाल्याने इच्छुक पुरुषांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्याच्या बेतात महिलांच्या पदरा आडून म्हणजेच आपल्या घरातील महिला सदस्यांना पुढे करून अप्रत्यक्ष राजकारण करण्यास सज्ज झाले आहेत. आरक्षणामुळे निर्माण झालेली मोठी समस्यां म्हणजे ज्या पुरुष नेत्यांच्या पत्नी शासकीय सेवेत आहेत त्याची झालेली कोंडी महत्वाची अडचण झाली असून अश्या ठिकाणी आपल्या आईला किंवा बहिणीला निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत. नियमानुसार शासकीय नोकरदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही अश्या परिस्थितीत आपल्या राजकीय व महत्वाकांक्षी असलेल्या पत्नीला सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायला लावणे हे कोणत्याही नेत्यांसाठी मोठे आव्हान आहे.ज्यामुळे काही ठिकाणी इच्छुकांची गोची झाली असून अनेकठिकानी तगड्या इच्छुकांना स्वतःला निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागल्याने त्यांची मोठी नाराजी पसरली आहे.नेत्यांना आता आपल्या पत्नीला उमेदवारी देऊन संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मागे उभी करावी लागणार आहे यात काही शंका नाही.
– कामठी च्या राजकारणात सध्या हाच चर्चेचा विषय
– इच्छुकांचे टेन्शन वाढले,राजकीय गुंतागुंत वाढली, कामठी च्या अनेक प्रभागात वर्षानुवर्षे तयारी करणारे आणि यावेळेस निवडून येण्याचे स्वप्न पाहणारे पुरुष उमेदवार अचानक बाहेर फेकले गेले आहेत.गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार फिल्डिंग लावली होती अश्या अनेक मातब्बर नेत्यांना आता आपली जागा पत्नीसाठी सोडावी लागली आहे त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द काही काळ तरी थांबणार आहे.




