-भाविकांनी घेतला भव्य महाप्रसादाचा लाभ
कामठी :- भक्ती, परंपरा आणि समाज अशा त्रिवेणी ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या कामठी येथील दुर्गादेवी नगर स्थित हनुमान मंदिरातील काकड आरतीची सांगता काल 5 नोव्हेंबर ला भव्य महाप्रसादाने करण्यात आली.
कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात खासदार श्यामकुमार बर्वे,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी, माजी नगरसेवक नीरज लोणारे,माजी सरपंच प्रवीण कुतथे,माजी सरपंच चंदू हेवट , रवी चमके,धीरज यादव,आशिष मेश्राम,प्रदीप साखरकर,सुमित गेडाम,फिरोजभाई,नागसेन सुखदेवें आदी मान्यवरांचा हनुमान मंदिर समिती तसेच काकड आरती उत्सव समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मागील कित्येक वर्षांपासून अखंड सुरू असलेली काकड आरतीची ही परंपरा आजही परिसरातील प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलत करीत आहे.पहाटेच्या शांत वातावरणात सुरू होणारी ही काकड आरती आता केवळ धार्मिक कार्यक्रम राहली नसून ती या दुर्गादेवी नगर परिसराचा ओळखीचा एक जिवंत वारसा बनली आहे.दुर्गादेवी नगर स्थित हनुमान मंदिरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या काकड आरतीने त्यांच्या श्रद्धा,निष्ठा आणि भक्तिभावाने परिसरातील नागरिकांना प्रेरित केले.या काकड आरतीचे नेतृत्व कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व काकड आरती उत्सव समितीचे पदाधिकारी काशिनाथ प्रधान यांच्या नेतृत्वात काकड आरती उत्सव समितीचे समस्त सहभागी भाविकगण उत्साही तरुण व बच्चे मंडळीनी आपल्या हाती घेतले आहे.दरवर्षी या आरतीचे नियोजन,सजावट,ध्वनी व्यवस्था आदी जवाबदारी मोठ्या उत्साहाने पार पाडतात त्यामुळे परंपरेला आधुनिकतेची जोड मिळत असून नव्या पिढीपर्यंत ही संस्कृती पोहोचविण्याचे कार्य या काकड आरती उत्सव समितीच्या समस्त भाविक गणाच्या माध्यमातून सुरू आहे. श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या या काकड आरती मुळे परिसरात एक वेगळाच भक्तिमय माहोल निर्माण झाला होता.पहाटेच्या वेळी मंदिर परिसरात घंटानाद, शंखध्वनी,आणि एकसुरात गाणारे काकड आरती हे दृश्य प्रत्येक भक्ताला अध्यात्मिक ऊर्जा देणारे ठरले.या काकड आरतीने परिसराला भक्ती,एकता आणि संस्कृतीची नवी दिशा दिली.काल महाप्रसादाने काकड आरतीची सांगता झाली यावेळी हजारोच्या वर संख्येतील भाविकांनी या भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला.




