spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रुपचंद जाधव चौकातील वाहतूक सुरळीत होणार

– आमदार, आयुक्त व पोलीस उपायुक्ताची संयुक्त पाहणी

नागपूर :- वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या गणेशपेठ येथील रुपचंद जाधव चौक (एस.टी.स्टँड चौक), वाहतूक सुरळीत करण्यासाठी संभाव्य उपाययोजनांच्या अनुषंगाने मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि नागपूर शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त लोहित मतानी यांनी गुरुवारी (ता.०६) संयुक्त पाहणी केली.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, धंतोली झोनचे सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे, अनिल गेडाम, राजेंद्र राठोड, उपअभियंता राहुल देशमुख आणि माजी नगरसेवक प्रमोद चिखले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, पोलीस निरीक्षण सुहास राऊत आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेद्वारे रुपचंद जाधव चौक हा इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विकसित केला जात आहे, ज्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना होणारा त्रास टळेल. यावेळी आयुक्तांनी चौकातील अतिक्रमण त्वरित हटविण्याचे निर्देश दिले. तसेच वाहतूक पोलिसांकडून ऑटो आणि ई-रिक्षावर नियमन व कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस.टी. स्टँड चौक) प्रशासन बसच्या आगमन आणि निर्गमन मार्गामध्ये आवश्यक ते बदल करणार आहे. सध्या बस स्थानकावर बसेस ये-जा करताना वाहतुकीत अडथळा निर्माण होत, असल्यामुळे या बदलांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की, पोलिसांच्या मते या चौकातील गोलाकार चबुतराचा (रोटरीचा) व्यास आकाराने मोठा असल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. या गोलाकार चबुतराचा (रोटरीचा) व्यास कमी केल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल, असे दटके यांनी सुचविले. त्यावर आयुक्तांनी स्पष्ट केले की, गोलाकार चबुतरा (रोटरीचा) हा इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच तयार करण्यात आला आहे. मात्र, पुढील एका महिन्यात निरीक्षण करून वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेत, आवश्यक ते बदल करण्यात येतील. तसेच आयुक्तांनी अतिक्रमण हटविणे आणि ऑटो-ई रिक्षांसाठी असणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. तसेच मार्ग अधिक रुंद झाल्याने बस वाहतुकीत अडथळा येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.