गडचिरोली :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार, 09 नोव्हेंबर 2025 रोजी गडचिरोली येथील विविध 4 उपकेंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते सायं.5.00 या कालावधीत घेण्यात येत असल्याने परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत. परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, प्रत्येक परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 8.00 ते सायं.7.00 वाजेपर्यत पोलीस कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे.
जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरातील पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मिटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, फॅक्स केंद्र, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमानां परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद राहतील. परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन,सेल्यूलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनी प्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये. तसेच कोवीड-19 चे अनुषंगाने,शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश निर्गमीत केले आहे.
सदर आदेश परिक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी,परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/कर्मचारी व पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही. तसेच हे आदेश दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षेच्या दिवशी संबंधित परीक्षा उपकेंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.




