Home Latest News गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

0

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार&comma; 09 नोव्हेंबर 2025 रोजी गडचिरोली येथील विविध 4 उपकेंद्रावर सकाळी 10&period;00 ते दुपारी 12&period;00 व दुपारी 3&period;00 ते सायं&period;5&period;00 या कालावधीत घेण्यात येत असल्याने परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत&period; परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे&period; त्याअनुषंगाने&comma; प्रत्येक परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 8&period;00 ते सायं&period;7&period;00 वाजेपर्यत पोलीस कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हादंडाधिकारी&comma; गडचिरोली यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरातील पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे&period; कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही&period; परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही&period; 100 मिटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन&comma; झेरॉक्स सेंटर&comma; सायबर कॅफे&comma; फॅक्स केंद्र&comma; पानपट्टी&comma; टायपिंग सेंटर&comma; एस टी डी बुथ&comma; ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमानां परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद राहतील&period; परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन&comma;सेल्यूलर फोन&comma;फॅक्स&comma; ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल&period; परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस&sol;वाहनास प्रवेशास मनाई राहील&period; परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनी प्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये&period; तसेच कोवीड-19 चे अनुषंगाने&comma;शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी&period; असे आदेश निर्गमीत केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर आदेश परिक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी&comma;कर्मचारी&comma;परीक्षार्थी&comma; परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी&sol;कर्मचारी व पोलीस अधिकारी&sol;कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही&period; तसेच हे आदेश दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8&period;00 वाजेपासून सायंकाळी 7&period;00 वाजेपर्यंत परीक्षेच्या दिवशी संबंधित परीक्षा उपकेंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी&comma; गडचिरोली यांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version