– प्रचाराला वेळच मिळणार नाही
कामठी :- कामठी नगर परिषद निवडणुकीचे वेळापत्रक घोषित झाले यात उमेद्वाराणी नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेबसाईट वर भरण्याकरिता 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंतचा अवधी दिला असून त्याची हार्ड कॉपी स्वीकारणे ,17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत तेही रविवार सुटीच्या दिवशी स्वीकारल्या जाणार नाही,अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर सकाळी 11 वाजेपासून वैध उमेदवारांची त्याच दिवशी ,अर्ज मागे घेण्याचा कालावधी 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यत,अपील नसल्यास 25 नोव्हेंबर शेवटची तारीख,सर्वात महत्वाची बाब नोंदणीकृत राजकीय पक्षांसहित निवडणूक चिन्ह मिळण्याची तारीख 26 नोव्हेंबर हाच खरा खेळ आहे.
नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळणार आहे हे निश्चित असल्या कारणानी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी त्यांची उमेदवारी घोषित होण्या अगोदरच बॅनर वर चिन्हासाहित प्रचार अगोदर पासून सुरू करतील बाकी उमेदवारांना मात्र त्यांचे चिन्हासाहित प्रचाराचे साहित्य छापायला वेळच मिळणार नाही .26 नोव्हेंबरला सायंकाळ पर्यंत चिन्ह मिळाल्यास अपक्षणा मोठी धावपड सुटणार असून त्यांना चिन्हासाहित प्रचाराला 27,28 29 ह्या तीनच दिवसाचा कालावधी मिळणार कारण प्रत्यक्ष मतदान 2 डिसेंबरला सकाळी साडे सात पासून सुरू होणार त्यामुळे त्याचे अगोदर 48 तासापूर्वी प्रचार बंद होईल .अशा अवस्थेत अपक्ष उमेदवारांचे काय हाल होतील याची कल्पना ही करणे कंठीण आहे यामुळे अपक्ष उमेदवारात आतापासूनच धाकधूक सुरु असली तरी अपक्ष उमेद्वाराणी आतापासूनच कंबर कसने गरजेचे आहे.




